“राष्ट्रीय सेवा योजना सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ’

भोसरी-  येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात सोमवार दि. 24 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या 50 व्या स्थापना दिनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची वाटचाल व विविध कार्यक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संदिप सांगळे व भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारीया यांच्या हस्ते यावेळी उद्‌घाटन करण्यात आले.
“राष्ट्रीय सेवा योजना हे सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ’ असल्याचे प्रा. डॉ. संदिप सांगळे म्हणाले.
राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांना समाज सेवेचे बाळकडू मिळतात असे प्रा. डॉ. अशोककुमार पगारीया म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक शिंदे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. रासेयो स्वयंसेवकांनी “स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर भित्ती-पत्रकांचे प्रदर्शन यावेळी भरवले होते. महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एच. पी. शिंदे, प्रा. अमेय काळे, प्रा. डॉ. स्वाती वाघ, प्रा. डॉ. विजय निकम, प्रा. सदाशिव कांबळे, प्रा. पांडुरंग भास्कर, प्रा. सुधाकर बैसाणे, प्रा. सचिन पवार, प्रा. प्रविण म्हस्के, प्रा. ऍड. महालक्ष्मी ठुबे, प्रा. विभा ब्राम्हणकर, प्रा. मिनाक्षी माकुडे, प्रा. गणेशराज कसबे, प्रा. प्रशांत रोकडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. अशोक शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. विजय निकम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)