राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेत 14 पदके मिळवून ब्लूमिंगडेलचे यश

नारायणगाव- रोप स्किपिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्हा रोप स्किपिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 व्या नॅशनल रोप स्किपिंग स्पर्धेत नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी विविध प्रकारांमध्ये 14 पदके जिंकली असल्याची माहिती प्राचार्य संघर्षा मेस्त्री यांनी दिली. 19 ते 22 जानेवारी दरम्यान शिर्डी येथे या स्पर्धा झाल्या.
महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, जम्मू काश्‍मीर, पंजाब येथील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. नारायणगावच्या विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थचे अध्यक्ष माजी आमदार वल्लभ बेनके, कार्याध्यक्ष अतुल बेनके, सचिव प्रा.पंजाब कथे, विश्वस्त गौरी बेनके, डॉ. पिंकी कथे, अमित बेनके, डी. डी. डोके, अरविंद ब्रह्मे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. या खेळाडूंना नवनाथ भालेराव, कीर्ती इंदोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

  • विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे –
    17 वर्षाच्या वयोगटात – हर्षल पुंगलिया – 2 रौप्य पदक, 2 कांस्य पदक, उन्नती कोळेकर – 2 रौप्य पदक, 1 कांस्य पदक,
    14 वर्ष वयोगटात – अमन कांगुलकर – 1 रौप्य पदक, 3 कांस्य पदक, साई गुंजाळ – 1 रौप्य पदक, 2 कांस्य पदक.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)