राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादन क्षेत्राचा वाटा वाढविणार

जयंत सिन्हा; अगोदरच विकसित सेवा क्षेत्रांकडेही सरकारचे बारीक लक्ष

मुंबई -2022 पर्यंत नव भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले. भारताला राष्ट्रीय विकासासाठी, वाहन उद्योग आणि टेलीकॉम सारख्या उद्योगांवर भर देण्याची गरज आहे. अशा उद्योगांच्या क्षेत्रात स्पर्धा करत आपण बाजी मारली, तर उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेता येईल आणि त्यामुळे देशाची उल्लेखनीय प्रगती होईल, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, उत्पादन क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 20 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे रोजगारनिर्मिती र्होयास मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले. भारतात रोजगार निर्मितीची जास्त गरज आहे. भारताने शेत ईकोसिस्टीम क्षेत्रात आघाडी घेण्याची गरज असल्याचे त्यानी मुंबई शेअर बाजाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.

नव भारताच्या निर्मितीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत, सरकारने गेल्या 4 वर्षात वस्तू सेवा कर, वित्त धोरण समिती, दिवाळखोरी कायदा, बॅंकिंग क्षेत्र सुधारणा, थेट लाभ हस्तांतरण आदी सुधारणा हाती घेतल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे ते म्हणाले.

दरडोई राष्ट्रीय सकल उत्पन्नात 1 हजार 800 डॉलर्सवरुन 5400 डॉलर्सपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची गरज आहे. पुढील 20 वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर 7 टक्‍क्‍यांवर राहिला तरच हे लक्ष्य साध्य होईल, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले.भविष्यात सकल राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादन क्षेत्राचा सहभाग 20 टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल असे त्यांनी सांगितले. नवीन उद्योग भावी आर्थिक वाढीला चालना देतील, असे सांगून हे नवीन उद्योग निश्‍चित करण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जपान सोबतच्या सहकार्याचा उल्लेख करतांना अजून अस्तित्वातही न आलेल्या उद्योगांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. सेवा क्षेत्र कायमच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा मजबूत घटक राहील, असे ते म्हणाले. कृषी क्षेत्राची उत्पादन क्षमता वाढवण्याबाबतही सरकार कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन भारत साकार होण्यासाठी आपण दर्जात्मक पैलूंकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय उद्योजकतेला मिळालेल्या चालनेमुळे वाढीचा पुढील टप्पा प्रत्यक्षात येईल. कर आणि राष्ट्रीय सकल उत्पन्न यांच्यातील गुणोत्तरात सुधारणा करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. भारतात गुंतवणुकीसाठी प्रचंड क्षमता असून, परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करायला उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार लवकरच मालवाहतूक धोरण जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. चीन बरोबर व्यापारी तूट असली, तरी ती कमी करण्यासाठी चीनसोबत करार केल्याचे सिन्हा यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)