राष्ट्रीयकृत बॅंकांमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

संग्रहित छायाचित्र...

तोटा लपवण्यासाठी कर्ज “राईट ऑफ’ केल्याने अनेकांना फटका
मुंबई – राष्ट्रीयकृत बॅंकांना मोठा उद्योगपतींकडून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे प्रकरणे उघडकीस आले आहे. या सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांनी आपला तोटा लपवण्यासाठी कर्ज “राईट ऑफ’ म्हणजे आपल्या तोट्याच्या लेख्यातून कमी केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कर्जमाफीच्या योजनेस पात्र असूनही ते या योजनेपासून वंचित राहत आहेत. याचा राज्यातील हजारो शेतक-यांना फटका बसत आहे.

राष्ट्रीयकृत बॅंकांनी शेतक-यांचे कर्ज “राईट ऑफ’ केल्याने अशा खातेदारांची यादी कर्जमाफीसाठी गेलीच नाही. मार्च 2014 पासून मार्च 2018 पर्यंत बॅंकांनी 3 लाख 15 हजार 514 कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ केली. त्यात शेतकऱ्यांच्या कर्जाचा वाटा आहे फक्त 17 हजार 426 कोटी रुपये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संकेतस्थळावरील माहितीनुसार काजळा गावातील सुमारे 80 शेतकरी हे जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेस पात्र होते. मात्र कर्जमाफीच्या कोणत्याच यादीत या शेतकऱ्यांचे नाव येत नव्हते. या सर्वाचे एक लाखापेक्षा कमी असलेले शेती कर्ज चार वर्षांपासून थकीत होते. त्यामुळे बॅंकांनी आपापल्या संचालक मंडळाकडून मान्यता मिळवून शेतकऱ्यांची कर्ज “राईट ऑफ’ म्हणजे बॅंकांच्या तोटा लेख्यातून वगळली.

बॅंकांनी कर्ज राईट ऑफ केली तरी शेतकऱ्यांच्या नावावरचा बोजा कमी होत नाही. त्यामुळे बॅंकांनी राईट ऑफ केलेल्या खात्यांची यादी कर्जमाफी योजनेसाठी गेलीच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सध्या कर्ज दिसत असल्यामुळे त्यांना इतर बॅंकांकडूनही नवीन पीककर्ज मिळत नाही.
याबाबत उस्मानाबादमधील सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सध्या कॅनरा बॅंकेची तक्रार आली आहे. इतरही बॅंकांनी असा प्रकार केला असल्याची शक्‍यता असल्याने बॅंकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी दिली.

ज्या राष्ट्रीयकृत बॅंकांनी खाती राईट ऑफ केली, त्यात एसबीआय, देना बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बॅंक अशा बॅंकांचा समावेश आहे. दरम्यान, राईट ऑफ केलेल्या कर्ज खात्याचा शेतकऱ्यांसंदर्भात आता सरकार काय धोरणात्मक निर्णय घेते याकडे सर्व शेतक-यांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)