राष्ट्रवादी 10, कॉंग्रेसचा 6 ग्रामपंचायतींवर दावा ; नक्की कोणाचे वर्चस्व हे गुलदस्त्यात 

इंदापूर तालुक्‍यतील 14 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर
रेडा: इंदापूर तालुक्‍यातील 14 ग्रामपंचायतींपैकी 1 बिनविराध झाले होती. तर 13 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज (गुरुवारी) स्पष्ट झाला. तर या ग्रामपंचायतींवर आमच्याच पक्षाचा सरपंच झाल्याचा दावा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेने केले आहे. यात 10 वर राष्ट्रवादीने तर 6 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने दावा केला आहे, त्यामुळे नक्की सर्वाधिक कोणत्या पक्षाने ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत हे गुलदस्त्यातच आहे.
इंदापूर तालुक्‍यातील 13 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी (दि. 26) मतदान झाले तर आज (गुरुवारी) मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, आज निकाल असल्याने शहरातील प्रशासकीय भवनासमोर सकाळपासूनच गर्दी झाली होती. तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, निवडणूक झालेल्या 13 ग्रामपंचायतींपैंकी कांदलगाव, कालठण नं.1, नं.2, बोराटवाडी, खोरोची, गोखळी, शेळगाव, वडापुरी, पवारवाडी या 9 ग्रामपंचायती यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होत्या. तर अगोती नं.-1,अगोती नं.2 , पंधारवाडी, उद्धट या 4 ग्रामपंचायती कॉंग्रेसकडे होत्या.
ग्रामपंचायत निवडणूकीतील विजयी सरपंच 
शेळगाव : रामदास शिंगाडे, वडापुरी : संगिता तरंगे, पंधारवाडी : दिंगबर निंबाळकर, उद्घट : रविंद्र यादव, पवारवाडी : प्रशांत करे, खोरोची : माया कांबळे, कांदलगाव : रविंद्र पाटील, कालठण नंबर 2 : सविता जाधव, कालठण नंबर 1 : सोनाली जाधव,अलका पोळ, अगोती नंबर 1 : मोनाली दळवी, अगोती नंबर 2 : चांगदेव ढुके, बोराटवाडी : दत्त सवाशे, , तरटगाव : पोपट माने (बिनविरोध).
कोट :
इंदापूर तालुक्‍यातील स्वाभिमानी जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल देवून राष्ट्रवादीवर विश्‍वास टाकला आहे. दहा गावच्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. यात शेळगांव, अगोती नंबर 1, नंबर 2, वडापुरी, तरटगाव, बोराटवाडी, कालठण नंबर 2, गोखळी, पंधारवाडी, खोरोची गावचा समावेश आहे.
– महारुद्र पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
कोट :
इंदापूर तालुक्‍यात आज मतमोजणी झालेल्या 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसने 5 ग्रामपंचायतींवर निर्विवादपणे विजय मिळविला आहे. तर तरटगाव ग्रामपंचायत बिनविरोध होऊन तेथे सर्वपक्षीय सत्ता आली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसकडील ग्रामपंचायतींच्या संख्येत वाढ झाली असून एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्येतही सुमारे 31 ने वाढ झाली आहे.
-कृष्णाजी यादव, तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस
इंदापूर : तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाला ऐकण्यासाठी झालेली गर्दी.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)