राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजपासून अधिवेशन

नवी दिल्ली – भारताच्या राजकारणाचे चाणक्‍य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातवे राष्ट्रीय अधिवेशन आज मंगळवारपासून दिल्लीत सुरू होत आहे. यात लोकसभेच्या निवडणुकीसह राष्ट्रीय मुद्यावर चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते प्रो. डी. पी. त्रिपाठी यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आणि कार्यसमितीची बैठक आज 28 तारखेला कॉंस्टीट्युशन क्‍लबमध्ये बोलाविण्यात आले आहे. यात देशभरातील पदाधिकारी सहभागी होतील. 2019 मध्ये होणाया लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाची नेमकी भूमिका ठरविण्याच्या मुद्यावर उद्या चर्चा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अश्वमेधाला आवर घालण्यासाठी राष्ट्रव्यापी महाआघाडी बनविण्याची जबाबदारी शरद पवार यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. देशभरातील धर्मनिरपेक्ष पक्षांना एकजूट करण्याच्या मुद्यावरही आज चर्चा होणार आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)