राष्ट्रवादी आधीच शिवसेनेने केले शाळेचे उद्घाटन

शिक्रापूर- बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून एकतीस लाख रुपये खर्चून बांधलेल्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन सर्वांना बरोबर घेऊन करणे गरजेचे असताना गावातील काही पदाधिकाऱ्यांनी फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव व फोटो टाकून कार्यक्रम घेतला जात असताना शिवसैनिकांनी आक्रमक होऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून सायंकाळचे उद्घाटन सकाळीच करून टाकले.
बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून चोवीस लाख रुपये आणि सर्व शिक्षा अभियानाचे सहा लाख रुपये खर्चून बांधली, त्यांनतर तिचे उद्घाटन सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन करणे गरजेचे असताना गावातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव पत्रिकेत छापले, तसेच गावामध्ये लावलेल्या फ्लेक्‍सवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो लावले, परंतु या विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव पत्रिकेत टाकले नाही त्यामुळे काही ग्रामस्थ आक्रमक झाले आणि राष्ट्रवादीचे उद्घाटन सायंकाळी असताना सकाळीच शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांचे बंधू बाबासाहेब आढळराव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेना नेते अरुण गिरे, जिल्हा परिषेदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर यांच्या हस्ते ग्रामस्थांनी उद्घाटन करून टाकले.
याप्रसंगी माजी सदस्या मनीषा पाचंगे, आंबेगाव पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, डॉ. रवींद्र टेमगिरे, पोलीस पाटील रुपाली टेमगिरे, रोशन रुके, विश्वनाथ टेमगिरे, अनिल नवले, पप्पू भोसले, माजी सरपंच सुशील रुके, नानासाहेब रुके, राहुल नळकांडे, सागर टेमगिरे, संजय टेमगिरे, वैभव ढोकले, नितीन दरेकर, चेअरमन विजय टेमगिरे, माजी उपसरपंच रामभाऊ रुके यांसह आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. तर यावेळी बोलताना यापुढे गावच्या विकासामध्ये मनमानी केल्यास खपवून घेतले जाणार नसल्याचे देखील काही ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच भाऊसाहेब टेमगिरे यांनी केले तर मुख्याध्यापक दादाभाऊ नळकांडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)