सभापती प्रवीण माने यांनी मानले आभार
रेडा- राष्ट्रवादी कॉंग्रेसला बेलवाडी गावकऱ्यांची साथ कायम असल्याने ग्रामस्थांचे आभार, याच कारणातून या गावातील विकास कामांना निधी देताना कोठेही कमतरता केलेली नाही. स्मशानभुमी अद्यावत करण्यासाठीही दहा लाखांचा निधी मंजूर केल्याचे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या कामांची पाहणी सभापती माने यांनी केली. यावेळी छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, सरपंच माणिक जामदार, उपसरपंच नानासाहेब पवार, दत्तात्रय जामदार, सतीश भिसे, सोमनाथ इंगवले, अमोल जगताप, रणजीत सवणे, नितीन जामदार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या निधीची मागणी गावाकडून केली जाईल, तो निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशीही ग्वाही सभापती माने यांनी यावेळी दिली.