राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा कॉंग्रेसचा निर्णय

ना. विखे, थोरातांवर महापालिका निवडणूकची जबाबदारी

नगर – डिसेंबर महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. त्याबरोबर या निवडणुकीची जबाबदारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर टाकण्यात आली असून दोन्ही नेत्यांनी एकत्र राहून पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची सुचना करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री मुंबईत प्रदेश कॉंग्रेसची बैठक झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय झाला. ना. विखे व आ. थोरात यांनी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचे सांगण्यात आले आहे.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रभारी मलिकार्जुन खर्गे, ना. विखे, आ. थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी ना. विखे व आ. थोरात यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रित नियोजन करण्याची सुचना करण्यात आली.
या बैठकीपूर्वी ना. विखे व आ. थोरात यांची स्वतंत्र बैठक प्रदेशाध्यक्षांनी घेतली. त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्यावेळी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होती. राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्याने या पक्षाने अपक्षांच्या मदतीने महापालिकेत सत्ता मिळविली होती. राष्ट्रवादीचा महापौर तर कॉंग्रेसचा उपमहापौर झाला होता. मात्र दुसऱ्या अडीच वर्षात कॉंग्रेसकडे महापौरपद असतांना राष्ट्रवादीने अंग काढू घेतले होते. त्यामुळे कॉंग्रेसचा महापौर झाला नाही. शिवसेनेचा महापौर झाला. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्‍त केली होती. राष्ट्रवादीने ऐनवेळी अंग काढून घेतल्याने शिवसेनेचा महापौर झाला. आताही राष्ट्रवादी जागा वाटपामध्ये देखील जास्त जागांची मागणी केली आहे.
अर्थात शहरात कॉंग्रेस औषधाला शिल्लक राहिली नाही. पक्षाचे 11 नगरसेवक असून त्यापैकी 7 नगरसेवक हे कोतकर गटाचे आहे. ते आता विखे गटाकडे गेले आहे. त्यातही दोन नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने सध्या ते कॉंग्रेसमध्ये नाही. त्याबरोबर काही नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या संपर्क आहे. त्यामुळे मुळ कॉंग्रेसचे नगरसेवकांची संख्या रोडावली आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिका निवडणुकीला पक्ष समोरे जात असल्याने प्रदेशाध्यक्षांनी ना. विखे व आ. थोरात यांना लक्ष घालण्याची सुचना केली आहे.शक्‍यता नाकारता येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)