पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांची मुदत 28 फेब्रुवारीला संपत आहे. नवीन सदस्यांची निवड 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चावी असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस लागणार आहे. समितीच्या आठ सदस्यांची 28 फेब्रुवारीला मुदत संपणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू मिसाळ आणि मोरेश्वर भोंडवे यांचा समावेश आहे. त्यांचा जागी दोन नवीन सदस्यांची येत्या महासभेत निवड केली जाणार आहे. स्थायी समिती सदस्यपदासाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी लेखी अर्ज देणे आवश्यक आहे. संबंधित इच्छुकांनी आपले अर्ज विरोधी पक्षनेते कार्यालयात समक्ष आणून द्यावेत, असे आवाहन महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा