पुण्यात राष्ट्रवादीत आमदारकीसाठी चढाओढ

पर्वती, वडगावशेरी, खडकवासला,हडपसर मध्ये रस्सी खेच


आठ विधानसभांसाठी 52 अर्ज


 

पुणे : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुण्यातील आठ जागांसाठी इच्छूकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी सुमारे 52 अर्ज पक्षाकडे प्राप्त झाले असून त्यात अवघे 6 अर्ज महिलांनी सादर केले असून 46 पुरूष उमेदवारांचे अर्ज आहेत. दरम्यान, ही इच्छूक उमेदवारांची यादी उद्या ( दि.3) रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली.

 

असे आले विधानसभानिहाय अर्ज 
वडगाव शेरी मतदार संघातून अवघे पाच अर्ज आले आहेत. त्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे,सुनील टिंगरे,सतीश म्हस्के, यांच्यासह तबस्सुम इनामदार,भीमराव गलांडे यांच्या नावांचा समावेश आहे. या मतदारसंघातून 2014 मध्ये पठारे यांनी निवडणूक लढविली होती. तर सुनील टिंगरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
————–
शिवाजीनगर मतदार संघातून पक्षाकडे अवघे चार अर्ज आले असून त्यात माजी नगरसेवक तसेच स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम, प्रदिप देशमुख, बाळासाहेब रानवडे, तसेच दयानंद इरकल यांनी अर्ज सादर केले आहेत. या मतदारसंघातून 2014 मध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी निवडणूक लढविली होती. मात्र, यावेळी त्यांनी पक्षाकडे अर्ज केलेला नाही.
—————-
कोथरूड मतदारसंघातून पक्षाकडे सुमारे 8 अर्ज आले आहेत. त्यात माजी सभागृह अध्यक्ष बंडू केमसे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने .लक्ष्मी दुधाने,विजय डाकले,संदीप बालवडकर,माणिक दुधाने,बाळासाहेब बराटे,स्वप्निल दुधाने,गणेश घोरपडे यांनी अर्ज केले आहेत. या मतदारसंघातून माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी निवडणूक लढविली होती. मात्र, यंदा त्यांनी अर्ज भरलेला नसल्याने तिकिटासाठी या मतदासंघात चुरस असणार आहे.
————–
डकवासला मतदार संघातील उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत सर्वाधिक चुरस असणार आहे. हा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सुळे यांना मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी विधानसभेच्या सर्वच इच्छूकांनी जोरदार फिल्डींग लावण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक इच्छूकाने सुळे यांच्या प्रचारात आपल्याही प्रचाराचा नारळ फोडला होता. या मतदारसंघात पक्षाकडून माजी महापौर दत्ता धनकवडे, महापालिकेतील विद्यमान गटनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी नगरसेवक काका चव्हाण,बाबा धुमाळ, यांच्यास भाग्यश्री कामठे यांनी अर्ज केला आहे. या मतदारसंघातून मागील विधानसभेला बराटे यांना संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला.
————-
र्वती विधानसभा मतदारसंघातून यंदा विधानसभेसाठी माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्‍विनी कदम त्यांचे पती नितीन कदम, यांच्यासह शशिकांत तापकीर, अर्चना हनमघर, निखील शिंदे यांनी अर्ज भरला आहे. मागील निवडणूकीत या मतदासंघातून पक्षाकडून सुभाष जगताप यांना संधी देण्यात आली होती. मात्र,त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
अश्विनी कदम, संतोष नांगरे, नितीन कदम, शशिकांत तापकीर, अर्चना हनमघर, निखिल शिंदे.
—–
हडपसर मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादीतून सर्वाधिक अर्ज आले आहेत. त्यात लाला गायकवाड, नगरसेवक अनिस सुंडके,सुरेश घुले,आनंद अलकुंटे, माजी महापौर वैशाली बनकर, प्रवीण तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, गफूर पठाण, बंडू गायकवाड, अशोक कांबळे, योगेश ससाणे, फारूक इनामदार, .नंदा लोणकर यांचे अर्ज आहेत. लोकसभा निवडणूकीत हा मतदारसंघ शिरूर मध्ये येतो. या ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाल्याने या मतदारसंघातून पक्षाकडे मोठया प्रमाणात अर्ज आले आहेत. दरम्यान, पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे सुध्दा या मतदारसंघातून इच्छूक असले तरी, पक्षाध्यक्ष असल्याने त्यांनी अर्ज सादर केलेला नाही. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अहे.
——-
कसबा, कॅन्टोन्मेंट मध्ये कमी प्रतिसादर
हे दोन्ही मतदारसंघ कॉंग्रेसला द्यावे लागणार असल्याचे अजित पवार यांनी या पूर्वीच स्पष्ट केल्याने या दोन्ही ठिकाणी आलेल्या अर्जांची संख्या कमी आहे. कॅन्टोन्मेंट मधून शांतीलाल मिसाळ, शैलेंद्र जाधव,अशोक कांबळे यांनी अर्ज केले असून कसबा मतदारसंघातून गणेश नलावडे, रवींद्र माळवदकर, विशाल गद्रे , वनराज आंदेकर, अशोक राठी, गोरख भिकुले यांचे अर्ज आल्याचे पक्षाने कळविले आहे.
—————–

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×