राष्ट्रवादीची ताकद दाखविण्यासाठी सज्ज व्हा !

युवा नेते आशुतोष काळे यांचे आवाहन पदाधिकारी निवडी जाहीर

कोपरगाव: “केंद्रात व राज्यात शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे हित साधणारे सरकार पाहिजे. अच्छे दिन येणार या आशेवर बसलेल्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. सरकारवर जनतेचा विशेषत: शेतकऱ्यांचा प्रचंड रोष आहे. कोपरगाव तालुक्‍यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार सत्ताधारी पक्षाला धडा शिकविणारच असून निश्‍चित परिवर्तन होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी निवडणुकांना सामोरे जातांना कोपरगाव तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,’ असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव येथे तीळगूळ वाटप कार्यक्रम व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडीत युवा नेते आशुतोष काळे बोलत होते.

काळे म्हणाले, “निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. हे लक्षात घेऊन पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावी. कार्यकर्त्यांनी मनात निर्धार केल्यास कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे.’ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडी करण्यात आली.

राष्ट्रवादी जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष- रमेश गवळी, युवक सरचिटणीस- ऍड. मनोज कडू, तालुका विद्यार्थी कार्याध्यक्ष- निखील डांगे, शहर अल्पसंख्याक सेल अध्यक्ष- जावेद शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी शहर अध्यक्ष- स्वप्नील पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, संतोष चवंडके, कृष्णा आढाव, नवाज कुरेशी, रावसाहेब लाठे, डॉ. तुषार गलांडे, अंबादास वडांगळे, राहुल देवळालीकर, सचिन परदेशी, चंद्रशेखर म्हस्के, गणेश ललकारे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, मुकुंद इंगळे, सतीश शिंदे, बाला गंगूले, नीलेश पाखरे, संदीप कपिले, धनंजय कहार, वाल्मिक लहीरे, ऋषिकेश खैरनार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)