राष्ट्रपती राजवटीवरून ममतांनी फटकारले

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावरून प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर सडकून टीका केली. घटनात्नक पदावरील काही व्यक्ती या भाजपाचे मूखपत्र असल्या सारखे वागतात. आमच्या राज्यातही अशा काही व्यक्ती समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

केंद्र आणि राज्य सरकार ही लोकांनी निवडलेली सरकार असतात. या घटनात्नक रचनेचा सर्वांनी आदर करायला हवा. घटनात्मक तरतुदीनुसार घटनात्नक रचनेनुसार काम व्हायला हवे. केंद्र आणि राज्य सरकार ही लोकनियुक्त असतात. पण काही व्यक्ती या मनमानी करतात, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

निवडणुकांचे निकाल लागून 20 दिवसांनंतर बहुमत सिध्द करण्यता अपयश आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यावर दोन दिवसांनी ममता बॅनर्जी यांनी टीका केली. मंत्री मंडळाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती राजवटीचा निर्णय जाहीर केला.

केंद्र सरकारने ऑक्‍टोबर पर्यंतचा राज्याचा परतावा न दिल्याने आपल्या सरकारला 640 कोटी रुपयांचा फटका बसला. याशिावय सरकारकडून अजून 17शे कोटी रुपये यायचे आहेत, असे त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.