राष्ट्राध्यक्षांनंतर मीच जास्त प्रसिद्ध : राशिद खान

मुंबईः  अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने आयपीएलमध्ये शानदार खेळ करत स्वतःला सिद्ध करून दाखवले. १९ वर्षाच्या असलेल्या राशिदने हैदराबाद सनरायजर्ससाठी चमकदार कामगिरी करत आयपीएलमध्ये २१ बळी घेतले. ‘आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुकाचे ट्विट केल्याने तर धक्काच बसला. पण या ट्विटला काय उत्तर द्यावं, हे एक-दोन तास सुचलंच नाही’, असं राशिद खान म्हणाला.

क्वॉलिफायर- २मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरोधात आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर जगभरातून राशिद खानवर कौतुकाचा वर्षाव झाला. ‘बसमध्ये चढत असताना एका मित्राने सचिन तेंडुलकरच्या ट्विटचा स्क्रिन शॉट पाठवला. ते ट्विट बघून मला धक्काच बसला. पण त्या ट्विटला काय रिप्लाय द्यायचा याचा विचार मी किमान एक-दोन तास करत होतो. अखेर मी त्या ट्विटला उत्तर दिले.

संपूर्ण अफगाणिस्तानने सचिन सरांचे ट्विट बघितले असेल. सचिन सर अफगाणिस्तानमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी माझे कौतुक केल्याने सर्वांनाच नवल वाटलं. त्यांच्या अशा कौतुकानेच तरुणांना प्रेरणा मिळते, असं राशिदने सांगितलं. भारतात क्रिकेटपटूंना जितका सन्मान मिळतो तेवढा अफगाणिस्तानमध्ये केला जातो का? या प्रश्नावर राशिदने उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या माहितीनुसार देशाच्या राष्ट्राध्यक्षांनंतर मीच सर्वाधिक प्रसिद्ध आहे’, असं लाजत राशिद खान म्हणाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)