राशीनच्या “वॉटर पार्क’ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

खेड – राशीन येथे वॉटर पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तेथे मोफत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा राशीनचे उद्योजक मेघराज बजाज यांनी केली. जिल्हा परिषदेच्या जळगाव चौफुला शाळेत शालेय फर्निचर वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
वासुदेव फर्निचरच्या वतीने शाळेला सहा कपाट, पाच टेबल तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी कविता बजाज, सरपंच नानासाहेब तोरडमल, मुख्याध्यापक सविता साळुंके, सुभाष लवांडे, राजू साखरे, भाऊसाहेब जंजिरे, सुनील डिसले, सतीश दानवले,बापूराव कदम, दादासाहेब शिंदे, कालिका क्षीरसागर, संगीता अडसरे, स्वाती जाधव आदी उपस्थित होते. या वेळी शाळेच्या वतीने मेघराज बजाज व उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ, गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दादासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. गौरव कदम व वैष्णवी घोडके या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. भविष्यातही गोरगरीब लोक तसेच शाळा व विद्यार्थ्यांना मदत करू, असे आश्‍वासन बजाज यांनी दिले. मुख्याध्यापक सविता साळुंके यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक सुभाष लवांडे यांनी सूत्रसंचालन केले.
ुसितपूर शाळेला फर्निचर भेट
जिल्हा परिषदेच्या सितपूर प्राथमिक शाळेला दोन संगणक टेबल, तीन ऑफिस टेबल, दोन कपाटे भेट देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ मंडलिक, उपसरपंच आप्पासाहेब गायकवाड, बापूराव कदम, अण्णासाहेब जगताप, सतीश जगताप, छत्रभुज भवर,बाबासाहेब लवांडे, धनंजय उदमले, नाना पोले, रावसाहेब जाधव, राजेंद्र सानप आदी उपस्थित होते. झुंजरूक सर यांनी सूत्रसंचालन केले. अण्णासाहेब जगताप यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)