“राम लखन’ 30 वर्षांचे

जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि डिंपलच्या सुपरहिट “राम लखन’ला रिलीज होऊन 30 वर्षे पूर्ण झाली. याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी माधुरी दीक्षितने एक छान कल्पना शोधून काढली. “राम लखन’मधील गाण्यामधील नृत्याविष्कार तिने पुन्हा एकदा रसिकांसमोर सादर केली आहेत. माधुरीने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने या सुपरहिट सिनेमाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या सिनेमातल्या गाण्यांना बघताना आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

“राम लखन’च्या संपूर्ण टीमबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता, असे माधुरीने म्हटले आहे. माधुरीने या पोस्टमध्ये “राम लखन’मधील “बडा दुख दीना’ या गाण्यातील काही अंश दाखवणारा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये तिने स्वतः नृत्य केले आहे. तर अनिल कपूरने “माय नेम इज लखन’वर परफॉर्मन्स केला आहे. सुभाष घई दिग्दर्शित “राम लखन’ 1989 साली रिलीज झाला होता. या सिनेमातील “माय नेम इज लखन’, “तेरा नाम लिया’ आणि “मेरे दो अनमोल रतन’ ही गाणी खूप हिट झाली होती. ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)