राम मनोहर लोहिया यांना भारतरत्न द्या : नितीश कुमार

पटना : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणारे थोर समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांना देशातील सर्वांत मोठा नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न प्रदान करावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. या बद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात नितीश कुमार यांनी लिहिले आहे, की ‘देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राम मनोहर लोहिया यांचे योगदान अमुल्य आहे. शिवाय त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातदेखील महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे गोवा विमानतळाला लोहिया यांचे नाव द्यावे.’ याशिवाय नितीश यांनी नमूद केले आहे, की ‘पंतप्रधान मोदी यांनी लोहिया यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना भारतरत्न द्यावा आणि गोवा विमानतळाला त्यांचे नाव देण्याबद्दल संबंधित मंत्रालयाला सूचना द्यावी.’ आता पंतप्रधान मोदी याबद्दल काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)