रामलीला मैदानाचं नव्हे, तर मोदींचेही नाव बदला – केजरीवाल

संग्रहित छायाचित्र....

नवी दिल्ली – दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाचे नाव बदलून, त्याला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महापालिकेतील भाजपच्या 5 नगरसेवकांनी दिला आहे. या प्रस्तावावरुन आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत, भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही बदलण्याची गरज आहे, तरच त्यांना मते मिळतील, असे म्हटले आहे.

रामलीला मैदान इत्यादीचे नाव बदलून अटलजी यांचे नाव दिल्याने मते मिळणार नाहीत. भाजपला पंतप्रधान मोदी यांचे नावही बदलावे लागेल. तेव्हा कुठे मते मिळतील. कारण त्यांच्या नावे तर लोक आत मतदान करणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगाविला.

दुसरीकडे आप नेत्या अलका लांबा यांनीही भाजपला धारेवर धरलं. अटल बिहारी वाजपेयी हे काय रामापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल करत, भक्तांना कळत नाहीय की भगवान रामाच्या नावाला विरोध करावा की अटलजी यांच्या नावाला, असे लांबा यांनी म्हटले आहे. आपच्या आरोपानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. आप खोटा प्रचार करत असून, भगवान राम आम्हा सर्वांसाठी आराध्य आहेत. त्यामुळे रामलीला मैदानाचे नाव बदलण्याचा प्रश्नच नाही, असे दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)