राफेल’ प्रकरणी पंतप्रधान निर्दोष नाहीत: खा.शेट्टी

अकोले – राफेल प्रकरणी देशात मोठा गदारोळ उडाला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोषी आहेत. या राजकीय चर्चेबाबत खा. राजू शेट्टी यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पंतप्रधान मोदी हे दोषीच आहेत, असा आरोप केला.
ऊस व दूध परिषदेनंतर खा. शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.यामागे निश्‍चितच प्लान आहे, असे सांगताना खा. शेट्टी म्हणाले, सुसंगती मांडत देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर होते. याची आठवण करून दिली. स्वच्छ चारित्र्याचे पर्रीकर गोव्याला मुख्यमंत्री म्हणून परत पाठवले गेले. त्यानंतर मोदी यांची भलामण करणाऱ्या निर्मला सीतारामन्‌ या संरक्षण मंत्री बनल्या. हा काही योगायोग नाही.असे सांगताना “राफेल’ खरेदी प्रकरण एका रात्रीत झाले नाही, अशी पुस्ती जोडली.
राज्यात 50 लाख लिटर रोज भेसळीचे दूध विक्रीला येते असा आरोप केला जातो आहे.त्याला त्यांनी छेद दिला. दूध उत्पादक भेसळ करीत नाहीत असे सांगून यामागे षडयंत्र आहे. अशी पुस्ती जोडून पतंजलीचे दूध व तूप याची चौकशी केली गेली पाहिजे असे ते म्हणाले. जर्सी गायांचे दूध व तूप पतंजली गोळा करून त्याला त्यांचे लेबल लावले जात आहे. आणि शेतकरी दुधाला बदनामी आणणारे नाटक रंगत आहे, असा त्यांनी आरोप केला.राज्य सरकारने दुधाला अनुदान दिले. पण 225 कोटी रुपयांचा निधी दूध संस्थाना सरकार मिळू देत नाही. तेव्हा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शेतमालाला दीडपट हमी भाव व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही दोन विधेयके आपण मंजुरीसाठी संसदेत मांडली आहेत. याला जन समर्थन मिळावे, यासाठी 28,29 व 30 नोव्हेंबर रोजी नवीदिल्लीत परिषदेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. 5 लाख देशभरातील शेतकरी तेथे उपस्थित राहणार आहेत. त्यावर सरकार काय निर्णय घेते. यावर आपण आगामी धोरण जाहीर करू असे स्पष्ट करून या विधेयकांना समर्थन देणाऱ्यांनाच लोकसभेसाठी मतदान करा असे आवाहन केले.
खा. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना “क्‍लीनचिट’ दिली आहे. या वृत्ताकडे त्यांचे लक्ष वेधले. तेव्हा त्यांचे वृत्त आपण वाचले नाही. अशी माहिती दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस सदस्यत्वाचा तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला आहे. या बातमीकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तारिक अन्वर गेले काही दिवस पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. पक्षात त्यांचा असंतोष हा राजधानीत चर्चेला विषय देवून गेला. पण नेमके इंगित काय आहे हे सांगणे अवघड आहे, असे ते म्हणाले.
खा. शेट्टी हे अकोलेत नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशीरा आले. तेव्हा दुपारचे एक वाजले होते.तरीही त्यांच्या स्वागताला आलेल्या शेतकऱ्यांनी लेझमाचा डाव सादर केला. फटाक्‍यांच्या आतषबाजीत स्वागत केले गेल्यावर त्यांची छत्रधारी व सजवलेल्या रथावरून अकोले गावात मिरवणूक काढली गेली. तर परिषदेच्या स्थळी म्हणजेच अकोले-इंदोरी फाटा अशा 4 किलो मीटर अंतराच्या कोल्हार-घोटी रस्त्यावर झेंडू फुलांच्या पाकळ्या टाकून खा.शेट्टी यांच्याबाबत आदर व्यक्‍त केला गेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)