राफेल घोटाळ्याविरोधात कॉंग्रेसचा आज महामोर्चा

मुंबई – राफेल विमान खरेदीच्या करारावरून अडचणीत सापडलेल्या सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी कॉंग्रेसने राफेल घोटाळ्याच्या विरोधात कॉंग्रेस आज (गुरूवारी) महामोर्चा काढणार आहे. लोकसभेतील गटनेते आणि प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली उद्या दुपारी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स ते आँगस्ट क्रांती मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी गेल्या आठवड्यात राफेल विमान खरेदीच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे राफेल खरेदीचा करार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत देशभरात आंदोलन सुरू केले आहे. या मोर्चात कॉंग्रेसचे हरियाणातील आमदार रणदीपसिंह सुरजेवाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पक्षाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेसच्या उद्याच्या महामोर्चासंदर्भात माहिती देताना मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरूपम म्हणाले, भाजप सरकारने राफेल विमान खरेदीमध्ये केलेला घोटाळा हा संरक्षण मंत्रालयाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा आहे. या घोटाळ्याला सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन जबाबदार आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मोर्चादरम्यान केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)