राफेल घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा!

कॉंग्रेस शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी : भाजपाला घेरण्यासाठी कॉंग्रेसचा महामोर्चा
मुंबई – राफेलच्या खरेदीत झालेल्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ्याचे सत्य बाहेर येण्यासाठी या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसने गुरूवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. ही चौकशी संसदेच्या संयुक्त समितीमार्फत अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली व्हावी, असा आग्रह कॉंग्रेसने धरला आहे.

राफेलवरून अडचणीत सापडलेल्या भाजपला घेरण्यासाठी कॉंग्रेसने राफेल विमान खरेदीच्या चौकशीच्या मागणीसाठी महालक्ष्मी रेसकोर्स ते आँगस्ट क्रांती मैदान असा मोर्चा काढला. कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात कॉंग्रेसचे महत्त्वाचे नेते सहभागी झाले होती. यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण्‌ विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार अस्लम शेख, अमीन पटेल आदी नेतेमंडळी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोर्चानंतर कॉंग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने राफेल खरेदीच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची आमची मागणी आपण राष्ट्रपतीपर्यंत पोहचवावी, अशी विनंती केली.

तत्कालीन कॉंग्रेसप्रिणत युपीए सरकारने फ्रान्सशी चर्चा करताना राफेल लढाऊ विमानाची प्रती किंमत 526 कोटी रूपये इतकी निश्‍चित केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2016मध्ये करार करताना राफेलची किंमत तिप्पट म्हणजे 1 हजार 670 कोटी रूपये इतकी निर्धारीत केली.

राफेलसाठी आँफसेट पार्टनर म्हणून एचएएल कंपनीची निवड करण्यात आली होती. मात्र, मोदींनी ऑफसेट पार्टनर म्हणून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स ही कंपनी निवडण्याचा आग्रह फ्रान्सकडे धरला. अंबानींच्या कंपनीला कोणताही अनुभव नसताना हे कंत्राट देण्यात आले. राफेलच्या खरेदी व्यवहारात पारदर्शकता नाही. तसेच सरकार यासंदर्भात कोणतीही माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे राफेलचा व्यवहार संशयास्पद असून त्याची चौकशी करण्यात यावी, असे कॉंग्रसेने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पैसे कुणाच्या खिशात गेले?
मल्लिकार्जुन खरगे यांनी मोर्चात बोलताना राफेलच्या खरेदीवरून भाजपवर जोरदार टीका केली. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांच्या विधानामुळे राफेल विमान खरेदीचा व्यवहार संशयाच्या भोव-यात सापडला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या माहितीमुळे भाजप उघडा पडला आहे. राफेलची किंमत तिपटीने वाढवून हजारो कोटी रूपये कोणाच्या खिशात घालण्यात आले? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी खरगे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)