राफेल गैरव्यवहार प्रकरणात कॉंग्रेसची आता राज्याराज्यात आंदोलने

सिमला – राफेल विमान खरेदीत झालेल्या गैव्यवहाराचा विषय आता जनतेच्या दरबारात घेऊन जाण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक राज्याराज्यात आंदोलने केली जाणार आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ आता हिमाचल प्रदेशात 2 ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार आहे.

युपीए सरकारच्या काळात 136 राफेल विमानांसाठी अत्यंत स्वस्तात हा खरेदी करार झाला असताना मोदी सरकारने हा करार रद्द करून हीच विमाने अत्यंत महागड्या दराने खरेदी करून मोठा घोटाळा केला आहे असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी हिमाचलात ही निदर्शने होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निमीत्ताने विभागीय आयुक्तांकडे राष्ट्रपतींच्या नावाने निवेदन पाठवले जाणार आहे. मोदी सरकारने 36 राफेल विमानांसाठी तब्बल 60145 कोटी रूपये मोजले आहेत. तथापी तेवढीच विमाने युपीएच्या करारारनुसार भारताला केवळ 18940 कोटी रूपयांत मिळाली असती. असा आरोप राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)