राफेलबाबत पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे शहांकडून स्वागत

नवी दिल्ली – मोठे राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या राफेल कराराबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले आहे. तसेच पवारांच्या वक्तव्याचा आधार घेऊन शहांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.

पक्षीय राजकारणापेक्षा राष्ट्रीय हितांना महत्व दिल्याबद्दल आणि सत्य बोलल्याबद्दल मी माजी संरक्षणमंत्री असणारे ज्येष्ठ खासदार पवार यांचे आभार मानतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल यांनी त्यांच्या मित्रपक्षाचे नेते असणाऱ्या पवार यांच्यावर विश्‍वास दाखवण्याचा सुज्ञपणा दाखवावा, असे शहा यांनी ट्विटरवरून म्हटले. राफेल करारावरून विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच पवार यांनी केलेले वक्तव्य एकप्रकारे भाजपला दिलासा देणारे ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)