राफेलच्या किंमतींवर आक्षेप घेणारे अधिकारीच “टार्गेट’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांचा सरकारवर नवा आरोप

नवी दिल्ली – राफेल लढाऊ विमानांच्या किंमतींवरून संरक्षण मंत्रालयातील ज्या अधिकऱ्यांनी आक्षेप नोंदवले होते, त्यांना मोदी सरकारकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी ट्‌विटरवर एका कवितेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हा आरोप केला. पंतप्रधानांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेडच्याऐवजी क्षुल्लक भांडवलदारांना लाभ मिळवून दिला. असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्या अधिकाऱ्यांनी या व्यवहारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले त्यांना शिक्षा केली गेली, तर ज्यांनी सरकारची बाजू घेतली त्यांना मात्र बक्षिसी दिली गेल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला.

संरक्षण मंत्रालयातील ज्या अधिकाऱ्यांनी राफेल विमानांच्या किंमतींवर शंका उपस्थित केली, त्यांना महिन्याभराच्या रजेवर पाठवण्यात आले आणि राफेल व्यवहाराला “डिफेन्स ऍक्विजिशन कौन्सिल’ची मान्यता दिली गेली होती, अशा अर्थ्हाच्या वृत्तालाही राहुल गांधी यांनी टॅग केले आहे.

याच वृत्ताचा हवाला देऊन कॉंग्रेस प्रवक्‍ते रणदीप सुर्जेवाला यांनीही ट्‌विटरवरून मोदी सरकारवर “व्हिसलब्लोअर’ना सुटीवर पाठवल्याची’ टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)