रानडुकरांमुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट

वन अधिकारी म्हणतात, साहेब गेल्यावर पंचनाम्याचं बघू

फलटण, दि. 28 (प्रतिनिधी) – आधीच नापिकी व त्यात निसर्गाचा लहरीपणा अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न जंगली वन्य प्राण्यांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या वेळोशी येथील अनेक शेतकऱ्यांनी दि. 27 रोजी फलटण येथील वनक्षेत्रपाल कार्यालयात वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई मिळावी, या मागणीचे अर्ज उपवनसंरक्षक कार्यालयात सादर केले. यावेळी अधिकाऱ्यांनी पुण्याचे साहेब येणार आहेत, ते गेल्यावर पंचनाम्याचे बघू असे उत्तर दिल्याने शेतकऱ्यांच्यात संतापात भर पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील वेळोशी व त्या आसपासच्या शेती शिवारात मागील अनेक दिवसापासून रानडुक्करांचा धुमाकूळ सुरू आहे. या वन्यप्राण्यांमुळे हातातोंडाशी आलेली बाजरी, घेवडा, मूग, कांदा, मका ही पिके रानडुक्करांनी उध्वस्त केली आहेत. अनेकवेळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी सांगूनही ते वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीच कारवाई करत नसल्याने या वन्यप्राण्याचा तत्काळ बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रत्यक्ष पंचनामा करावा या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी सातबारा, फोटोसह अर्ज सादर केले. अनेक शेतकऱ्यांनी पुर्वानुभव पहाता भरपाईसाठी अर्ज दाखल करणे टाळले.

शेतात काबाडकष्ट करत लाख मोलाचे बियाणे खरेदी करून बियाणांची उगवणीपासून ते पिकांची वाढ होईपर्यंत बळीराजाला मोठी काळजी घ्यावी लागते. शेतात मोर, रानडुकरं यासारखे वन्यप्राणी पिकात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. एका अंदाजाप्रमाणे त्यामुळे पिकांचं 40 ते 50 टक्के नुकसान होत. परिणामी, उत्पादन घटून मोठा आर्थिक फटका देखील शेतकऱ्याला सहन करावा लागतो. यामुळे शेतकरी हैराण होतात. असाच फटका आणि उत्पन्नातील घट अनुभवणाऱ्या फलटण तालुक्‍यातल्या वेळोशी गावच्या लोकांना वनविभागाच्या अजब कारभार फटका बसत आहे. पिकांची नुकसान भरपाई व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त यासाठी अर्ज दाखल करण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांना वनक्षेत्रपाल कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांनी “पुण्याचे साहेब दोन दिवसात येणार आहेत. चार दिवस फार काम आहे. शनिवारी पंचनाम्यास येतो” असे अजब उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याची सेवा महत्वाची आहे का? असा सवाल करत अगोदरच पिकांचे झालेले नुकसान पाहता राहिलेले पिक वाचवण्यासाठी धरपडणाऱ्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या उदासिनतेकडे पाहत घरचा रस्ता धरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)