रात्रीत दहा दुकाने फोडली

वडूजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ : खताच्या दुकानातून पावणेदोन लाख लंपास

वडूज, दि. 30 (प्रतिनिधी) – येथील वडूज-कराड रस्त्यावरील चोरट्यांनी धुमाकूळ घालत दहा दुकाने फोडली. यातील यश प्लाझामधील रत्नाई ऍग्रो क्‍लिनिक खताच्या दुकानातील रोख रकमेसह सुमारे 1 लाख 70 हजारांची रकमेसह साहित्यही लंपास केले. तसेच इतर दुकानातील शटर कटावणीने उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वडूज पोलिसात गुन्हा नोंद झाला असून दत्तात्रय पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत वडूज पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, रविवारी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी यश प्लाझामधील असलेल्या दत्तात्रय पाटील यांच्या मालकीचे असणारे रत्नाई ऍग्रो क्‍लिनिक या औषधे, बी-बियाणे व खताच्या दुकानाचे शटर कटावणीने तोडून तेथील ड्रॉवरमधील सुमारे 1 लाख 70 हजार तसेच दुकानातील लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, हार्डडिक्‍स आदींसह 1 लाख 70 हजार रोख रक्कमेसह ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच याच कॉम्प्लेक्‍समध्ये असलेले मोटार सायकल गॅरेज, मोरया पान शॉप, आर. के. रेडियम ही दुकाने फोडून किरकोळ साहित्य चोरून नेले आहे. तसेच कुरोली फाटा येथील शरद औटे यांचे भवानी कार पॉइंट हे दुकान फोडण्याचा प्रयत्न करत असताना दुकानाच्या वरच्या मजल्यावर झोपलेले जाधव खाली आले. त्यांची चाहूल लागताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. तथापि, दुकानाचे शटर उचकटताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्याच्या समोर असणारे सद्‌गुरू पानशॉप फोडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले असून त्यांनी तोंडाला रूमाल बांधले असल्याने चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर श्‍वान पथकही पाचारण करण्यात आले. तथापि, कुरोली फाट्यापर्यंत श्वान जाऊन घुटमळले. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार शांतीलाल ओंबसे तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)