राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भेट ; मनसेकडून पेट्रोल ४ रुपयांनी स्वस्त

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वसामान्यांना एक दिवसासाठी दिलासा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे.

येत्या १४ जून रोजी मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे.
मनसे सरकारमध्ये नसूनही ४ रुपयांनी स्वस्त पेट्रोल देत असेल, तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना मोदींना हे कसे शक्य नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1001457022649405440

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)