राज्य शासनाकडून काटी-वडापुरीला विशेष निधी

रेडा- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई मंत्रालयाकडून प्राप्त निधीतून काटी-वडापुरी काटी गटासाठी निधी प्राप्त करून घेण्यात यश आले असून या गटातील गावांच्या विकास कामांसाठी 91 लाख 80 हजार 951चा निधी मंजूर झाल्याचे तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या गटातील सार्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पुणे जिल्हा परीषदेचे सदस्य अभिजित तांबिले यांनी सांगितले.
तांबिले म्हणाले की, काटी-वडापुरी गटातील गावागावांतील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. गावातील अनेक प्रस्ताव प्रस्तावित असून त्या कामांना देखील काही दिवसांत मंजुरी मिळेल. दलित वस्तीतील सुधारणा, पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, अद्यावत गटार योजना यासाठी निधी मिळणार आहे.
यानुसार काटी गाव अंतर्गत हनुमाननगर रस्ता कॉंक्रीटीकरण, बीजलीनगर समाजमंदिर बांधकाम, दत्तवाडी रस्ता, बाभूळगाव लोंढे चिलारेवस्ती कॉंक्रीटीकरण, रेडणी गावातील दलीतवस्तीवरील कॉंक्रीटीकरण, राजेंद्र भोसलेवस्ती कॉंक्रीटीकरण, शहा गावठाण अंतरंग रस्ता, कांदलगाव अंतर्गत चांदनेनगर रस्ता, साठेनगर कांदलागाव रस्ता, वरकुटे खुर्द अंतर्गत हेगडेवस्ती, पवारवस्ती कॉंक्रीटीकरण रस्ता, हरणेशेत मिसाळवस्ती कॉंक्रीटीकरण रस्ता, मासाळवस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण, हिंगणगाव जगतापवस्ती कॉंक्रीटीकरण रस्ता, रेडणी रघुनाथ चव्हाण वस्ती पाणीपुरवठा योजना, धांडोरे वस्ती पाणी पुरवठा, हनुमंत भोसले वस्ती पाणीपुरवठा, सुनील रामा भोसलेवस्ती रेडणी पाणीपुरवठा, सुभाष भोसलेवस्ती पाणीपुरवठा योजना, बाभूळगाव गावठाण भूमिगत गटार योजना ही कामे मंजूर आहेत.

  • गावागावांत वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना मंजूर झाल्या असून यामध्ये यशवंत घरकुल, रमाई घरकुल, कोंबडी पिल्ले, खोराडी, पिठगिरणी, दुधाळ गायी वाटप, कडबा कुट्टी, प्लास्टिक क्रेट, 3 इंची पीव्हीसी पाईप, सरी रेझर, 10 शेळी गट, मैत्रीण शेळ्या, मिल्क मशीन, ताडपत्री अशा अनेक योजनांचा लाभ नागरीकांना मिळाला आहे, असेही जिल्हा परीषदेचे सदस्य अभिजित तांबिले यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)