राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोन ठिकाणी कारवाई

कुरकुंभ येथे 1 लाख 38 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त

कुरकुंभ- येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्यावर बुधवारी (दि. 1) कारवाई करण्यात आली असून, यावेळी 1 लाख 38 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संगीता अर्जुन राठोड (वय 28, रा. कुरकुंभ ता. दौंड), जरिना ओमशे राठोड (वय 35, रा. पांढरेवाडी, एमआयडीसी ता. दौंड) यांना अटक करण्यात आली असून गाडीचालक फरार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरकुंभ व पांढरेवाडी (ता. दौंड) परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री केली जात असल्याची माहीती खबऱ्यानुसार माहिती मिळाली असता शुक्रवारी (दि. 1) दौंड विभागातील राज्य उत्पादन शुल्क बिट न. 1 च्या पथकाने कारवाई केली. यावेळी एक कार (एमएच 12 एएन 7716), तसेच विक्री साहित्य आणि गावठी दारू अशी एकूण 1 लाख 38 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक आर. आर. साळुंखे, कोळी, इंगळे, अमर कांबळे यांनी केली असून, पुढील तपास आर. आर.साळुंखे करीत आहेत.

  • कुरकुंभ येथे अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. या बेकायदेशीर गावठी हातभट्टीवर कारवाई करून हे धंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी येथील महिलांकडून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.