राज्यात बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस; लातूरमध्ये एकाचा मृत्यू

लातूर : पूर्व मोसमी पावसाने लातूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील नणंद गावात घडली. दुपारपासूनच लातूर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उकाडा वाढला होता. लातूर शहर आणि परिसर, ग्रामीण भाग यात पावसाच्या हलक्या सरी  बरसल्या. मात्र निलंगा तालुक्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात नणंद या गावाच्या शिवारातील शेतकरी नारायण लादे यांच्यावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

वाऱ्याचा जोर जास्त असल्याने अनेक झाडे पडली, तसेच एक मोबाईल टॉवरही कोसळला. वाऱ्याचा जोर वाढल्याने घरावरील पत्रे उडून गेले आहेत. बोटकूळ गावात घरावरचे पत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचा गुळ भिजून लाखोंचं नुकसान झालं आहे. कोकणातही पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाला. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर जिल्ह्यातील अन्य भागात ढगाळ वातावरण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून सध्या उष्णतेच्या लाटीने काही प्रमाणात माघार घेतल्याची माहितीही स्कायमेटने दिली. विदर्भातील ठराविक भागात अजूनही उष्णतेचा तडाखा कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जास्त उष्णता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण विदर्भाच्या काही भागांत हलकासा पाऊस झाल्यामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली. त्यामुळे सध्या तेथील तापमान 40 अंशांपर्यंत नोंदवले जात आहे. रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून 24 तासात नागपूर येथे 35.8 मिमी, सातारा 33 मिमी, कोल्हापूर 7 मिमी, तर वर्धा येथे 1.6 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असल्याची माहिती स्कायमेटने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)