राज्यात पावसाला पोषक वातावरण नाही

file photo

पुणे,दि.28 – पोषक हवामान नसल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती राहणार असून, मंगळवारपर्यंत राज्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम पावसाची नोंद झाली असली तरी उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली आहे.

पश्‍चिम उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र, पंजाबच्या फिरोजपूरपासून कमी दाबाच्या केंद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला मान्सूनचा आस यामुळे उत्तर भारतात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर पूर्व भारतातही ढगांची दाटी झाली आहे. महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतामध्ये मात्र हलके ढग असल्याने पावसाने दडी मारली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात सध्या दिवसभर ढगाळ हवामानाबरोबरच एक-दोन सरी वगळता पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे.
पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारपर्यंत (ता.30) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मंगळवार नंतर राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन होण्याची शक्‍यता आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)