राज्यात पावसाची शक्‍यता

पुणे – वायव्य भारताच्या पश्‍चिमी चक्रावाताची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उत्तरेकडून राज्यात येणारे थंड वाऱ्याचे प्रवाह कमी झाले आहेत. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे. या अस्थिर हवामानामुळे 24 ते 26 जानेवारीदरम्यान राज्यात पावसाची शक्‍यता हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आली आहे.

देशात पश्‍चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्याच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे शुक्रवारी (25 जानेवारी)नंतर मध्य भारतासह विदर्भात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. जम्मू-काश्‍मिर आणि हिमालय पर्वतालगतच्या भागात तीव्र पश्‍चिमी चक्रावात सक्रिय झाला आहे. वायव्य भारतात जमिनीलगत जोरदार वारे वाहणार आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडणार आहे.विशेष करून विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमधील भागांत विजेच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)