राज्यात नगर जिल्हा गटशेतीत प्रथम क्रमांकावर

डॉ. के. पी. विश्‍वनाथा ः उन्नत शेती -समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा
नगर – नगर जिल्हा हा सर्वच गोष्टींत अव्वल क्रमांकावर आहे. अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांसाठीच काम करीत आहेत. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गट शेती महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यात गटशेतीचे काम उत्कृष्ट आहे. त्यामुळे राज्यात नगर जिल्हा हा गट शेतीत अव्वल क्रमांकावर आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने आयोजित उन्नत शेती – समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळेप्रसंगी डॉ. विश्‍वनाथा बोलत होते. यावेळी संचालक विस्तार व शिक्षण डॉ. किरण कोकाटे, डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक विलास नलगे, सुधाकर बोराळे, डॉ. कल्याण देवळाणकर, डॉ. यु. बी. होले आदी उपस्थित होते.
विश्‍वनाथा पुढे म्हणाले की, कपाशीवरील गुलाबी बोंडअळीमुळे शेतकरी हताश झाला आहे. मागील वर्षी शेतकर्यांचे नुकसान लक्षात घेता येणार्या वर्षी त्यावर उपयायोजना कराव्यात. शेतकऱ्यांना औषध फवारणीचे प्रात्यक्षिक द्यायला हवे. तळागाळातील शेतकऱ्यांचे ग्रुप करून त्यांचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. लहान लहान शेतकऱ्याला समृद्ध करायचे आहे. सेंद्रीय शेती संकल्पना चांगली आहे. सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्यानी कंपोस्ट खत केले पाहिजे. नगर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. पंतप्रधानांचे स्वप्न आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे, ते साकारायचे आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी दुग्ध व्यवसाय खूप महत्त्वाचा घटक आहे. कृषी विभाग आणि विद्यापीठ यांच्या समन्वयाने शेतकऱ्यासाठी काम करू, असे ते म्हणाले.
यावेळी संचालक विस्तार शिक्षणचे डॉ. किरण कोकाटे म्हणाले की, कृषी सहाय्यक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या सहकार्याने एक आदर्श जिल्हा करता येईल. कृषी सहाय्यकांचे मनोगत घ्यायला हवेत. नगर जिल्ह्याचे आर्थिक उत्पादन हे वाढले आहे, ही कौतुकाची बाब आहे. प्रत्येक शेततळ्यात मत्स्यपालन केले, तर वर्षाकाठी 35 हजार उत्पन्न मिळेल. एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करा, असे सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संदीप लोणारे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजना 2017-18, शेततळे अस्तरीकरण, जलयुक्त शिवार अभियान, गाव पूर्णत्वाची माहिती, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड ठिबक सिंचन योजना सन 2017-18ची सविस्तर माहिती देऊन 2 मे 2018 रोजी किसन कल्याण दिवस साजरा करण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्हाटे, डॉ. शरद गडाख, डॉ. कल्याण देवळणकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विलास नवगे यांनी केले, तर आभार आर. के. गायकवाड यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)