राज्यात दीड वर्षांत रेबीजचे 52 बळी

उपचार अर्धवट सोडणाऱ्यांची संख्या अधिक : पुण्यात 6 जणांचा मृत्यू
पुणे- कुत्रा किंवा अन्य प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे “रेबीज’ या रोगाची लागण झाल्याने राज्यात दीड वर्षांत 52 बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. मुख्य म्हणजे उपचार अर्ध्यावर सोडणाऱ्यांची संख्या अधिक असून या रुग्णांचा मृत्यू होण्याची दाट शक्‍यता मानली जाते. यामध्ये पुण्यात मागील वर्षी एक तर यावर्षी पाच जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे.
रेबीज हा विषाणूजन्य आजार असून प्राण्यांच्या चाव्यामुळे लाळेच्या माध्यमातून तो माणसाच्या शरिरात प्रवेश करतो. हा रोग झाल्यानंतर माणसाच्या मृत्यूची दाट शक्‍यता असते. यासाठी प्रतिबंधक लस तयार करण्यात आली असली तरीही आजाराची लागन झाल्यानंतर तो बरा करण्यासाठीची लस अद्याप उपलब्ध नाही. हा आजार कुत्रा, वटवाघूळ, गाय, मांजर, शेळी, मेंढी, डुक्‍कर, उंट या पाळीव प्राण्यांबरोबरच जंगली प्राण्यांमध्येही आढळतो. यामध्ये कुत्र्याने चावा घेऊन रेबीज आजार पसरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2017 व जानेवारी ते जून 2018 या कालावधीत 52 बळी गेले असून त्यामध्ये सर्वाधिक 12 हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. तर, त्याखालोखाल सोलापूर जिल्ह्यात 10 जणांचा तर कोल्हापूर व सांगली प्रत्येकी 9 जणांचा बळी गेला आहे. पुण्यात 6 तर मुंबईतील संख्याही मोठी असण्याची शक्‍यता आहे. मात्र मुंबईची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. 2017 या वर्षात रायगड जिल्ह्यात 123 रेबीज संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यामध्ये कोणाचाही जीव गेल्या नसल्याचेही समोर आले आहे. राज्यात दीड वर्षांत 21 जणांनी उपचार अर्धवट सोडले आहेत. ज्या रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्‍यता असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कुत्रा किंवा अन्य पाळीव प्राण्यांनी चावा घेतल्यास त्त्वरीत वैद्यकीय सल्ला घेत अँटी रेबीजची लस घेणे गरजेचे आहे. ज्या व्यक्‍ती पाळीव प्राणी किंवा जंगली प्राण्यांच्या संपर्कात असतात त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अँन्टीरेबीज लस घेणे आवश्‍यक आहे. शासनाकडून याबाबत जनजागृती करण्यात येत. परंतु, नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. जितेंद्र डोलारे, साथ रोग अधिकारी, राज्य आरोग्य विभाग

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात आठ महिन्यांत साडेपाच हजार जणांना चावा
राज्यात एकीकडे रेबीजच्या रुग्णांची संख्या इतकी मोठी असताना पुण्यात मात्र भटक्‍या कुत्र्यांचा चावा घेतल्याच्या तब्बल 5 हजार 584 घटना गेल्या आठ महिन्यांत समोर आल्या आहेत. याचाच अर्थ प्रतिदिन जवळपास 23 जणांना कुत्र्यांच्या चाव्याला सामोरे जावे लागते. पुण्यात भटक्‍या कुत्र्यांची संख्या मोठी असून त्यांच्या निर्मितीवर अद्यापही पूर्णपणे नियंत्रण आणणे पालिकेला शक्‍य झालेले नाही. मात्र त्यामुळे भविष्यात शहराला रेबीजचा मोठा धोका संभवताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)