राज्यात उभारणार 500 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प

मुंबई – ऊर्जाक्षेत्र आणि विशेषतः कृषीक्षेत्र यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि देशात प्रथमच राबविल्या गेलेल्या “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सध्या एकूण 500 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यास गती आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एकूण 200 मेगावॅट क्षमतेचे, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 300 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प मार्गी लावण्यात महानिर्मितीला यश मिळाले आहे. हे सर्व प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्र येथे उभारण्यात येणार असल्याने एकूणच राज्याच्या सर्वांगीण कृषी उद्योगास चालना मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यातील 200 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणी अंतर्गत 150 मेगावॅट सौर प्रकल्पासाठी व 50 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्पासाठीचे स्वतंत्र कार्यादेश पारदर्शक निविदा प्रक्रियेतून निवडलेल्या विकासकाना देण्यात आलेले आहेत. महानिर्मिती व संबंधित विकासक यांच्यामध्ये या सर्व प्रकल्पांसाठीचे वीज खरेदी करार संपन्न झालेले आहेत.
सध्या पहिल्या टप्प्यातील 20 मेगावॅट क्षमतेचा गव्हाणकुंड सौर प्रकल्प, प्रत्येकी 2 ते 7 मेगावॅट क्षमतेचे कुही, येरड, अंजनगाव-बारी, येवती या सर्व सौर प्रकल्पस्थळी पायाभुत सुविधा उभारणीचे काम महानिर्मितीतर्फे सुरु आहे. या ठिकाणी वीजवहनाकरिता वीज उपकेंद्र उभारणीचे कामही महावितरणतर्फे नियोजित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच दुसऱ्या टप्प्यातील 300 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्पासाठीचे कार्यादेशही देण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यातील सौर प्रकल्प डिसेंबर 2018 पर्यंत व दुसऱ्या टप्प्यातील सौर प्रकल्प फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकते.

24 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी व यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथील महानिर्मितीच्या प्रत्येकी 2 मेगावॅट क्षमतेच्या महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पाची क्रियान्वयन चाचणी संपन्न झाल्यानंतर अन्य तांत्रिक चाचण्यादेखील सुरु आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठीचा वीज खरेदी करार नुकताच महानिर्मिती व महावितरणमध्ये संपन्न झाला आहे. हे प्रकल्प महानिर्मिती, महावितरण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)