राज्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार : विनोद तावडे

मुंबई : राज्य सरकार आता CBSE, ICSE बोर्डाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार आहे. या निमित्ताने CBSE, ICSE बोर्डाशी टक्कर देणारी शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे, याविषयीची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

SSC बोर्डचा अभ्यासक्रम काहीसा सोपा आहे. तर CBSE, ICSE बोर्डाचा कठीण आहे. त्यामुळे वेगळे आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करत दहावीच्या अभ्यासक्रमाची पातळी वाढवली जाणार आहे. या वर्षी राज्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या 13 शाळा सुरु केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशा आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरु केल्या जातील किंवा काही शाळांना आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमात सामावून घेतलं जाणार आहे, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)