राज्यातील वृद्धाश्रमांना सोईसुविधा पुरवणार आहात का?-उच्च न्यायालय

मुंबई : राज्यातील वृद्धाश्रमांना सोईसुविधा पुरवणार आहात का? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले आहे. राज्यात वृद्धाश्रमांची संख्या आधिच कमी असून त्यातही वृद्धाश्रमांमध्येही योग्य प्रकारे सोईसुविधा पुरविल्या जात नाहीत, असेही उच्च न्यायालयाने म्हटले.

अपुऱ्या वृद्धाश्रमांमुळे म्हातारी माणसे रस्त्यांवरील फुटपाथचा आधार घेताना दिसून येतात. सरकार याप्रकरणी दिरंगाई करत असून न्यायालयाकडून केवळ वेळ मागून घेत आहे. त्यामुळे वृद्धाश्रमांना आधुनिक सोई सुविधा पुरवण्यासाठी यापुढे आणखी किती वेळ मागणार आहात? असा सवाल करीत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.
तसेच, याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत वृद्धांच्या तक्रारी निवारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लवादाची नेमकी भूमिका काय? ते देखील स्पष्ट करण्यास उच्च न्यायालयाने राज्यसरकारला बजावले आहे. याप्रकरणी मिशन जस्टिस या संस्थेनं यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)