राज्यातील टीईटी अपात्र शिक्षकांना दिलासा

2013 नंतरच्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आणखी एक संधी
पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून 13 फेब्रुवारी 2013 नंतर रुजू होवूनही अद्याप शिक्षक पात्रता परीक्षा पात्र नसणाऱ्या शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. या शिक्षकांना टीईटी पात्र होण्यासाठी आणखी एक संधी शासनाने दिली आहे. मात्र, 30 मार्च 2019 पर्यंत टीईटी पात्र न झाल्यास या शिक्षकांना आपल्या नोकरीला मुकावे लागणार आहे.
राज्यात शिक्षण हक्‍क कायदा लागू झाल्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीसाठी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना टीईटी पात्र होणे, अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, टीईटी परीक्षा घेण्याची प्रक्रियाच 2013 पासून सुरू झाली. त्यामुळेच 13 फेब्रुवारी 2013 रोजी शासनाने टीईटी उत्तीर्ण होणे, बंधनकारक केले होते. याबाबत शासनाने सेवेत असणाऱ्या शिक्षकांना तीन संधींमध्ये परीक्षा पास होण्याची अट घातली होती. जर शिक्षक तीन संधीमध्ये पात्र ठरले नाहीत, त्यांना शिक्षक या पदावरून पायउतार व्हावे लागणार होते. त्यानुसार राज्यातील शिक्षकांना 30 जून 2016 पर्यंत परीक्षा पास होण्यासाठी दिलेली मुदत आता 30 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
याबाबत शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, केंद्र पातळीवर व राज्य पातळीवर कालावधी दिला जावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र पातळीवर 31 मार्च 2015 पर्यंत देण्यात येणारी मुदत 4 वर्षे वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील शिक्षकांसाठी देखील ही मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच, यापुढे शिक्षकांच्या रिक्‍त पदांवर होणारी शिक्षक भरती प्रक्रिया ही पवित्र प्रणालीद्वारेच होईल; अन्य कोणत्याही मार्गान होणार नाही, हे देखील शासनाने नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)