राज्याची कर्ज आणि व्याज भरण्याची क्षमता…

चंद्रकांत पाटील : नोंदणी, मुद्रांक शुल्क विभागात उद्दीष्टाच्या अधिक महसूल जमा


उद्दीष्ट 23 हजार कोटींचे, जमा झाले 26 हजार 500 कोटी

पुणे – महसूल चांगला असून राज्याची कर्ज फेडण्याची आणि व्याज भरण्याची क्षमता आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने यावर्षी 26 हजार 500 कोटींचा महसूल जमा केला आहे. हा महसूल राज्यातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महसूलमंत्री पाटील यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची बैठक घेतली. तसेच

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 2018-19 या आर्थिक वर्षात उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल पाटील यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, सहसचिव श्‍यामसुंदर पाटील, नोंदणी सहमहानिरिक्षक नयना बोंदार्डे, अप्पर मुद्रांक नियंत्रक सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री पाटील म्हणाले, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागापुढे यंदा 23 हजार कोटींचा महसूल गोळा करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने याउद्दीष्टाच्या पुढे जावून 26 हजार 500 कोटींचा महसूल जमा केला आहे. हा जादा महसूल राज्यातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी उपयोगात येणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील दुष्काळ निवारण करणे, बोंड आळीमुळे झालेले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, रस्ते बांधणी अशा कामांसाठी या महसूलाचा वापर करता येणार आहे.

नोंदणी महानिरीक्षक कवडे यांनी विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. नोंदणी उपमहानिरीक्षक सोनप्पा यमगर, मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल कवडे, नगर रचना सहसंचालक सुधाकर नांगनुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रलंबित प्रश्‍नांबाबत लवकरच बैठक
नोंदणी व मद्रांक विभागात मनुष्यबळाची कमतरता, रिक्त पदे, पदोन्नतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे, असे काही अधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनात आणून दिले. त्यावेळी विभागातील सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी येत्या दहा दिवसांत स्वतंत्र बैठक घेवू. तसेच पदोन्नतीची फाईल मंत्रालयात आहे. त्याचाही पाठपुरावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)