राज्यमंत्र्यांच्या गावात मतदान जनजागृती

परिंचे- यादववाडी (ता. पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती मोहीमे अंतर्गत गावातून प्रभातफेरी काढून मतदार जनजागृती करण्यात आली. राज्यमंत्री विजय शिवतारे व जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव यांचे यादववाडी हे गाव असून सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले, तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात प्रभातफेरी काढून मतदार जागृती करण्यात आली.

मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश देवून राष्ट्राच्या उभारणीस हातभार लावण्याबाबत आवाहन करण्यात आले. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देऊन मतदारांचे प्रबोधन करण्यात आले. मतदारांच्या विविध शंकाचे निरसन शाळेचे शिक्षक वसंत ताकवले यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप नेवसे, वसंत ताकवले, अब्दलगणी तांबोळी, राजेंद्र शिरसाट, दीपक भोसले, मंगेश बोरकर, अशोक बाणे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. याप्रसंगी रमेश यादव, रामभाऊ यादव, गुलाब यादव, योगेश यादव, अनिता यादव, अतुल जोशी, सागर वचकल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.