राज्यभरात 10 हजार रिक्त पदांची भरती 

संग्रहित छायाचित्र

जिल्हा रुग्णालयात लवकरच केमोथेरपी उपचाराची सुविधा 

मुंबई – ग्रामीण भागात नागरीकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यभरात डॉक्‍टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी तसचे विविध संवर्गातील 10 हजार रिक्त पदे भरणार असल्याची घोषणा नवनियुक्त आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. तसेच कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी उपचाराची सुविधा सुरु करणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोग्य मंत्री डॉ. दिपक सांवत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या विभागाचा अतिरिक्त पदभार सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आरोग्य विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर शिंदे यांनी आज प्रथमच अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत चांगली आरोग्य सेवा देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली. राज्यभरात डॉक्‍टर, नर्सेस तसेच विविध संवर्गातील 15 हजार 500 रिक्त जागा आहेत. यापैकी 10 हजार रिक्त पदांची लवकरच भरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कामगार वीमा रूग्णालयांची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 1600 कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे, असे सांगतानाच राज्य कामगार विमा योजन सोसायटीचे अध्यक्षपद मुख्य सचिवांकडे असावे कि आरोग्य मंत्र्यांकडे… हा वादही आता मिटला आहे. ते पद मुख्य सचिवांकडे राहणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून कामगार विमा रुग्णालयांची डागडूजी तसेच नवीन उपकरणांसह अनेक यंत्रसामग्री खरेदी करून रुग्णालये अद्ययावत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)