राज्यघटना सांभाळण्याची सर्वांची जबाबदारी

आमदार दत्तात्रय भरणे : वालचंदनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
————–
वालचंदनगर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भारत देशाला नसून संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरलेले आहेत. या महान विचाराचे पालन सर्वांनी करावेत. शिल्पकार भारतरत्न डॉं.बाबासाहेब यांनी स्वतःच्या विकासाठी शिक्षण घेतलेले नव्हते तर देशातील सर्वसामान्य दीनदुबळ्यांना व देशाला महान बनविण्यासाठी घेतले. राज्यघटना लिहिली नसती तर देशातील जनता गुलाम राहिले असते. देशातील सर्वांनी राज्यघटना सांभाळण्याचे काम करावे, असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. आमदार भरणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निलध्वजारोहन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत ैहोते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. परिसरात अनेक ठिकाणी निलध्वजारोहण करून पुष्पहार अर्पण करून आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषेद बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी वालचंदनगर कंपनीचे जनरल मॅनेजर ए. सी. नगरकर, आशुतोष साळवे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे, वालचंदनगरचे सरपंच छाया मोरे, पोपट मिसाळ, आत्माराम लोंढे, शैलेश फडतरे, मधुकर डोंबाळे, अतुल तेरखेडकर, विजय खरात आदी मान्यवर उपस्थित होते. सिध्दांत लोंढे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन नलिनी सोणवणे व पार्वती बनसोडे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.