राजुरीचे वातावरण पोवाड्यामुळे शिवमय

बेल्हे- राजुरी येथे शाहीर देवानंद माळी यांनी सादर केलेल्या वेशभूषेसह पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. पोवाड्यामुळे गावचे अखंड वातावरण शिवमय झाले होते.

राजुरी (ता.जुन्नर) येथे झी टॉकीज फेम, राष्ट्रपतींच्या हस्ते व महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्काराने सन्मानित केलेले शाहीर देवानंद माळी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर पोवाड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहीर माळी यांचा मुलगा पृथ्वीराज माळी याने पोवाडा सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू यांची पात्रे वेशभूषासह सादर केली.

माजी सभापती दिपक औटी, सरपंच संजय गवळी, माजी सरपंच माऊली शेळके, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गटकळ, उपाध्यक्ष प्रमोद पाटील औटी, चंद्रकांत जाधव, वल्लभ शेळके, एकनाथ शिंदे, सतीश पाटील औटी, एम.डी.घंगाळे, अनंतराव गटकळ, जि.के.औटी, अशोक औटी, तुळशीराम हाडवळे, रमेश कणसे, राजेंद्र औटी, वैभव शिंदे, गजानन चव्हाण, संजय पिंगळे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.