राजीनामा सत्र ग्रामपंचायतीपर्यंत

हिंजवडी – सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षणावरून राज्यातील लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा राजनामा देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवत असताना राजनामास्त्राचे लोन आता ग्रामपंचायतपर्यंत पोहचले आहे. माण ग्रामपंचायतचे सदस्य संदीप साठे यांनी राजनामा दिला आहे.

मराठा समाजाने लाखोच्या संख्येत तब्बल 58 मोर्चे शांततेत काढले मात्र शासनाने त्याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उगारण्यात आले आहे. दिवसें-दिवस आंदोलन चिघळत चालले आहे. त्यातून लोकप्रतिनिधींनी पदांचे राजीनामे देण्याचे सत्र सुरु केले आहे. ग्रामपंचायत स्तरावरही राजीनामा देण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून संदीप साठे यांनी सदस्य पदाचा राजीनामा देत इतर पदाधिकाऱ्यांनाही आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)