राजस्थान ट्रॅक्‍टर स्पर्धेतील दुर्घटनेत 260 जण जखमी 

गंगानगर: राजस्थानात एका ट्रॅक्‍टर स्पर्धेच्या वेळी झालेल्या दुर्घटनेत 260 जण जखमी झाले आहेत. गंगानगर येथे एक ट्रॅक्‍टर स्पर्धा चालू असताना ही दुर्घटना घडली आहे. गंगानगर येथील ट्रॅक्‍टरची शर्यत हे या पंचक्रोशीतील मोठे आकर्षण असते. दूरदूरचे हजारो लोक ही शर्यत पाहायल्ला येतात. गुरुवारी झालेल्या या ट्रॅक्‍टर स्पर्धेच्या वेळी एक शेड कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली.
धानमंडीच्या या शेडवर सुमारे 2,000 लोक चढून बसले होते. त्यांचे वजन सहन न झाल्याने शेड कोसळली. शेडवर बसलेल्यांपैकी 260 जण जखमी झाले असून त्यापैकी 50 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेन अनेक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्‍यता प्रत्यक्षदर्शिंनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री वसुंधार राजे भोसले यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)