राजस्थानात अवैध वास्तव्य करणाऱ्या 22 बांगलादेशींना अटक

जयपूर – राजस्थानमध्ये अवैध वास्तव्याबद्दल 22 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अलवर जिल्ह्यातील निम्रानामध्ये ही कारवाई केली. संबंधित परिसरात 11 बालकांसह 33 बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना रविवारी ताब्यात घेण्यात आले. त्यातील 22 प्रौढांना अटक करण्यात आली. अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींपैकी काहींनी आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रे मिळवल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली.

संबंधित बांगलादेशी विटांच्या कारखान्यात काम करत होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांची कसूून चौकशी करत आहेत. मागील काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांत बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची मोहीम सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)