राजवर्धन सिंग राठोर यांनी उद्योजकांना क्रीडाक्षेत्रात गुंतवणुकीचे केले आवाहन

नवी दिल्ली, जुलै २६ (पीटीआय) आज केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंग राठोर यांनी उद्योजकांना भारतातील क्रीडाक्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. क्रीडामंत्री राठोर यांनी सांगितले की भारत सरकार ८- १० वर्षांच्या प्रतिभावान खेळाडूंना निवडून त्यांच्यातील  प्रतिभा आणि कौशल्य वाढवण्यासाठी योजना आखणार आहे आणि त्यातून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

कंफेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)च्या ग्लोबल स्पोर्ट्स समिट स्कोरकार्डमध्ये आलेले राठोर पुढे बोलताना म्हणाले की ,”एका मर्यादित वेळेत यामध्ये १० कोटी विध्यार्थी असतील. यामध्ये आम्ही शैक्षणिक संस्था, राज्य सरकारे आणि त्याचबरोबर सशस्त्र दले यांच्यासोबत भागीदारी करणार आहोत. ते या मुलांची निवड माफक शारिरीक चाचणीतून करतील.”  पहिल्या चाचणीनंतर मुलांची संख्या कमी करून ५००० करण्यात येईल. त्यानंतर उच्यदर्जाची चाचणी घेऊन १००० मुलांची निवड करण्यात येईल.
” त्यांच्या शारिरीक क्षमतांनुसार योग्य खेळासाठी त्यांची निवड करून पुढील ८ वर्षांसाठी त्याला ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल. जेव्हा ते मूल १६ होईल तेव्हा त्याला विजेता होण्याची क्षमता प्राप्त होईल. क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.” असेही ते म्हणाले. कुठल्याही खेळाडूने निधी मागण्यासाठी संकोच करू नये. ते जोर देत म्हणाले की “येथे निधीची कमतरता नाही. “
१९९० पासून ते  आजपर्यंत, सर्व ऑलंपिक पदक विजेते आणि ज्यांच्या पदक मिळवण्याचे सामर्थ्य आहे अश्या सर्व खेळाडूंना निधी हा नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलोपमेंट फंड (एनएसडीएफ) यांनी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी पीएसयुच्या माध्यमातून आला आहे, आता आम्ही हे सर्वांनी सामील होण्यासाठी खुले करत आहे.
सरकार या वर्षी उत्पादकांची परिषद घेण्याचा विचार करीत आहे, जेथे आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या भारतीय भागीदारी कंपन्यांच्या सोबत येऊन सरकारला  भारतात क्रीडा  साहित्य उत्पादन करण्यासाठी योजनेत काही बदल करायचे असतील तर ते सुचवतील. “२०१९ मध्ये, क्रीडाक्षेत्र ७५ बिलियन अमेरिकन डॉलरचा आकडा गाठेल, हे त्या खेळाडूंसाठी तर खूप चांगले आहेच पण उद्योजकांसाठी देखील चांगले आहे.  भारतीय क्रीडा क्षेत्रासोबत  येण्याची हीच वेळ आहे.”असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)