राजगुरूनगरात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रम उत्साहात

राजगुरूनगर- येथे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शासकीय ध्वजारोहण वरिष्ठ सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाले.
येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसद यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, कार्यकारी अभियंता भास्कर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, राजेश कानसकर, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, होमगार्ड चे प्रमुख लालासाहेब घुमटकर, खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, शिवसेनेचे गणेश सांडभोर, मनसेच्या नीता आल्हाट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित लुणावत, संदीप भोसले, डॉ. प्रदीप शेवाळे, प्रदीप कासवा, बाळासाहेब सांडभोर, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील वाळूंज, मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शहरातील शाळांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी महसूल विभागाच्यावतीने सातबारा ऑनलाईन करण्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या तलाठ्यांचा प्रशस्ती पात्रक देवून सन्मान करण्यात आला. गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांचा तालुक्‍यात वनमित्र मोहीम यशस्वी राबविल्याबद्दल गौरव करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, होमगार्ड, एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह ध्वजास मानवंदना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)