राजगुरूनगरातील अरुंद पूल धोकादायक

संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची भीती : 100 वर्षांपूर्वीचा पूल

राजगुरूनगर- येथे पुणे नाशिक महामार्गावरील एसटी बसस्थानका समोरील अरुंद पुलावर संरक्षक कठडे नसल्याने धोक्‍याची परिस्थिती कायम आहे.

राजगुरूनगर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अरुंद पूल आहे. या पुलावर नेहमीच वाहतूककोंडी असते त्यातच पुला शेजारी डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या बाजूने रस्त्याचा भराव खचल्याने तेथून जाणाऱ्या नागरिकांना धोक्‍याचे झाले होते. पुणे-नाशिक महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते. दिवसेंदिवस रस्त्याचा भराव खचू लागल्याने आणि धोका वाढल्याने हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गाच्या नाशिक येथील कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला होता त्याची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने राजगुरूनगर येथील पुलाच्या शेजारी संरक्षक कठडे बांधले आहेत. मात्र, पुलावर मात्र संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचे प्रमाण मोठे आहे.

रस्त्यापासून फक्त दीड फूट उंच पूल बांधला त्यावेळी (100वर्षांपूर्वी) कठडे बांधले आहेत. वर्षांनुवर्षे या पुलावर डांबरीकरण करण्यात आल्याने त्यावर साचलेल्या थरामुळे संरक्षक कठड्यांची उंची कमी झाली आहे. आता ही उंची दीड ते दोन फूट राहिल्याने पुलावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी धोक्‍याचे बनले आहे. संरक्षक कठडे नसल्याने कधीही अपघात होण्याची भीती वाढली आहे. त्यातच पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर बाह्यवळण होण्यास अजून दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे या पुलाची वेळेत डागडुजी होणे अथवा नवीन पूल बांधणे गरजेचे झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)