राजगुरूनगरला पावसाने झोडपले

राजगुरूनगर- शहराला आज (रविवारी) सायंकाळळी चारच्या सुमारास वादळी पावसाने झोडपले. जवळपास अर्धातास झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले. गटारव्यवस्था अद्यावत नसल्याने ती भरून वाहू लागल्याने वाडा, पोस्ट ऑफिस, नगर पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले. यामध्ये अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये पाणीच पाणी झाले होते.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज राजगुरूनगर शहरात जोराचा पाऊस झाला. गेली काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. राजगुरूनगर शहर परिसर वगळता इतर ठिकाणी पाऊस पडत होता. राजगुरूनगर शहरात पाऊस पडण्याचे वातावरण तयार होत होते मात्र, पाऊस पडत नव्हता. त्यातच शहरातील रस्त्यांवर घाण, चिखल थोड्या पावसाने होत होता मात्र, आज झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते चकाचक झाले. अनेक दिवसांच्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेनंतर आज जोराचा पाऊस पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. राजगुरूनगर शहरात वाडा रस्त्यावर गटार व्यवस्था नसल्याने आज झालेल्या जोरदार पावसाचे पाणी गटारे तुंबल्याने रस्त्यावर आल्याने नागरिकांना रस्ताशोधत जा-ये करावी लागली. तर शहरातील खोलगट परिसरातील गृह सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते.

  • शेतकऱ्यांचे नुकसान
    तिन्हेवाडी, सातकरस्थळ, चांडोली, चास,पाडळी, पांगरी, बुट्टेवाडी , वडगाव पाटोळे, दोंदे आदी गावांच्या परिसरात झालेल्या वादळी आणि जोरदार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडली, पोल्ट्रीफार्म व जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे काहीसे नुकसान झाले.रब्बी हंगामातील बाजरी ज्वारीची पिके भुईसपाट झाली आहेत. वादळी पावसाचा कांदे लागवडीवर परिणाम झाला.
  • “सांग सांग भोलानाथ’चा… आला प्रत्यय
    सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काया बाल गीताची आज आठवण झाली. येथील महात्मा गांधी विद्यालयातील पटांगणात पावसाने मोठे तळे साठले होते. या तळ्यातील पाण्यात सायकल चालविण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवरता आला नाही. वाडा रस्त्यावर संगम क्‍लासिक जवळ पावसाचे पाणी साठवून मोठे तळे साचले होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)